दुष्काळ तिच्या पाचवीला पुजलेला, त्यात यंदा हालत भयंकर. सावकाराचं कर्ज, भिशीतली उचल, शे – पाचशेचं हात उसनं तर वेगळंच. 4 पोरांना खाऊ घालायचं एक ना अनेक चिंता त्यात भरीस भर म्हणून पहिल्या बाळंतपणाला आलेली मोठी लेक. विचार कर करुन डोकं अक्षरश: तडकायचं बाकी होतं. गावातल्या रोजगार हमीवर पण काम नव्हतं, मागच्याच कामाचा रोज मिळाला नव्हता. उन्हा तान्हात राबून पायांना पडलेल्या भेगा, ऊस तोडून अंगाचं झालेलं चिपाड यामुळं ती सुद्धा मरायला टेकली होती, पण मरुन चालेल कसं पाच लेकरं आणि लेकीच्या पोटात असलेल्या लेकरामुळं तिला आत्महत्या करायची मुभाच नव्हती, तिच्या नवऱ्यासारखी.
गावातल्या तानुबायचा निरोप आला, अन तिनं पायातलं चिंबलेलं जोडवं, नाकातली फुली बिली विकून चार – पाचशे रुपये घेतले. पोरांना आठवड्याभराचं डाळ – तांदूळ, मीठ आणलं. मोठ्या लेकीच्या हातावर 50 रुपये ठेवले. पोरांच्या तोंडावरुन हात फिरवून, मुका घेऊन ती निघाली. बारकं पोरगं रडत होत, मागं लागलं होतं.. पण ती टेम्पोत जी बसली ते मागं लागलेल्या पोरगं दिसेनासं होईपर्यंत मागं वळून बघायचा तिचा धापसाच झाला नाही.
तानूबरोबर टेम्पोतनं तालुक्याला येईपर्यंत तिला दिसत होती तिची पोरं, बारक्या पोराचं रडणं.. मुंबईच्या एस.टीत बसल्यावर मात्र तिला दिसू लागलं.. रस्त्यावरचं काम, दीडशे रुपये रोज.. शंभर रुपयाच्यावर रोज हातात न पडलेल्या तिला 50 रुपयांची ‘इन्क्रीमेंट’ म्हणजे खूपच होती. शिवाय आठवड्याने पैसे मिळणार. आठवड्याचे हजाराच्यावर मिळणार. पोरांना पाचशे रुपये पाठवले तर दोन टाईम पोटभर जेवण मिळणार होतं. शे –दोनशेत तिचं भागलं तरी उरलेल्या दोन – तीनशे रुपयांची जमाजम करुन तिला नंतर मोठ्या लेकीची डिलीवरी चांगली करता येणार होती. एखादी साडी, चांदीचा का होईना एखादा डाग, चार दोन खायच्या वस्तू लेकीसाठी.... स्वप्न बघता बघता ती मुंबईत कधी पोचली, तिलाही कळलं नाही.
आज ती लय खुशीत. आज हप्त्याभराचा एक हजार पन्नास रुपये रोज मिळाला होता. लगोलग तानुबायजवळ पाचशे रुपये पाठवायचे, पोरांना खायला पाठवायचं.. जिलेबी, बुंदी.. तिनं मोठ्या लेकीला फोन पण केला. पोरांशी बोलून तिला भरून आलं. थोड्या वेळानी निघायचं म्हणून ती तानुबरोबर तिथंच रस्त्याच्या कडेला मिसरी घासत बसली दोन मिनटं. मिसरीचं शेवटलं बोट दातावर फिरवून दिवसाचा सगळा क्षीण विसरुन ती हसली, मिनीटभर डोळे बंद केले. समोरुन भस्सकन रोलर आला अन दोघींच्या अंगावरुन पुढे गेला.
पोरं जीव डोळ्यात आणून येणाऱ्या प्रत्येक गाडीची वाट बघत होती. आईनं काय काय पाठवलं असेल याची स्वप्न रंगवत होती. थोरल्या लेकीला गोडाचं डोहाळं लागलं होतं. शेजारची म्हातारी म्हणाली.. बया माह्याराला आलीस.. सगळं व्हईल बग नीट.. तुझी आय तुझं सगळं करंल.. गर्भार बाईच्या डोळ्याला सारखा टिपूस बरं नाय.

कथा टाईपून झाल्यावर मधूने लॅपटॉप बंद केला.. आईने किचनमधून आवाज दिला.. चहा घे गं..लवकर गार होईल.. कप आणायला ती आत गेली. आईला मिठी मारुन म्हणाली.. सो स्वीट ऑफ यू मम्मा.. हॅप्पी मदर्स डे....
No comments:
Post a Comment